Afghanistan vs Pakistan – शांतता चर्चा फिस्कटली; युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला अफगाणिस्तानने लायकी दाखवली
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटली आहे. पाकिस्तानच्या इस्तंबूल येथे सुरू असलेल्या शांतता चर्चेची शेवटची फेरीही निष्फळ ठरली आहे. यावेळी युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला अफगाणिस्तानने लायकी दाखवली. युद्धाच्या परिस्थितीत स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार त्यांना असल्याचे अफगाणिस्तानने म्हटले. अर्थात शांतता चर्चा फिस्कटली असली तरी दोन्ही देशांमधील युद्धविराम कायम असल्याची पुष्टी तालिबानने केली.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी शांतता चर्चेत अपयश आल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानने काबुलमध्ये अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी घेण्याची अट घातली होती. पाकिस्तानची ही मागणी अवाजवी होती. त्यामुळे शांतता चर्चा फिस्कटली, असे मुजाहिद यांनी म्हटले.
आमच्याकडून युद्धविरामाचे उल्लंघन अद्याप झालेल नसून पुढेही ते आम्ही काटेकोरपणे पाळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी युद्धाच्या परिस्थितीत अफगाणिस्तानला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार असल्याचेही म्हटले.
इस्तंबूलमध्ये शांतता चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषेवर गोळीबार सुरू होता. चर्चेवेळीही याचे पडसाद उमटले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी सीमा संघर्षामुळे इस्तंबूलमध्ये झालेल्या शांतता चर्चेला यश आले नाही असे म्हटले. अफगाणिस्तानच्या भूमीवरून हल्ले होत नाही तोपर्यंत युद्धविराम कायम राहिले, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून तुर्की आणि कतारने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली होती. दीर्घकालीन स्थैर्यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List