आजीच्या कुशीत झोपलेल्या 4 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार, चेहऱ्यावर दिसल्या चावल्याच्या खुना
पश्चिम बंगालमधील हुगळी शहरात एका चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत एका नाल्यात पडलेली सापडली असून तिच्या चेहऱ्यावर चावलेल्याच्या खून आढळल्या आहेत.
पीडित मुलीचे कुटुंब हे हुगळीतील तारकेश्वर भागात रस्त्यावर राहते. शुक्रवारी रात्री पीडित मुलगी तिच्या आजी सोबत मच्छरदानीमध्ये झोपली होती. तिचे पालक देखील तिथेच शेजारी झोपले होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने मच्छरदानी कापून त्यातून मुलीला पळवून नेले. त्यानंतर एका अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला व तिला नाल्यात फेकले.
मुलगी गायब असल्याचे पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. तब्बल तासाभरानंतर त्यांना तारकेश्वर स्थानकाजवळील एका गटारात मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. त्यांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List