भवानीनगर येथे 25 लाखांचा गांजा जप्त, वालचंदनगर पोलिसांची कारवाई
भवानीनगर येथील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल शंभर किलो पंचवीस लाख रुपये किमतीचा गांजा पकडला आहे. बारामती बी के बी एन रस्त्यावरती होंडा सिटी गाडीच्या डिकीमध्ये सापडला हा गांजा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी फिरोज बागवान, प्रदीप गायकवाड, मंगेश राऊत, अश्रम सय्यद सर्व रा.मळद (बारामती)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा गांजा हैदराबाद येथून घेऊन विक्रीसाठी बारामती मध्ये घेऊन येत असतानाच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना माहिती मिळाली. वालचंदनगर पोलीस ठाण्याची टीम तयार करत बावडा -बारामती रस्त्यावरती होंडा सिटी गाडी अडवत ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, अविनाश शिळीमकर, गणेश काटकर, उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार, सचिन गायकवाड, शरद पोफळे, महेश पवार, अभिजीत कळसकर, गणेश वानकर, राहुल माने, ओंकार कांबळे आदींनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List