महिना लाखभर पगार घेणाऱ्या महिलेने न्यायालयात खोटे सांगितले, न्यायालयाने बदलला निर्णय

महिना लाखभर पगार घेणाऱ्या महिलेने न्यायालयात खोटे सांगितले, न्यायालयाने बदलला निर्णय

घटस्फोटानंतर नवऱ्याकडून भरगच्च पोटगी वसूल करण्यासाठी एका महिलेने न्यायालयात खोटी माहिती दिली. ही महिला नोकरी करत असून तिला महिना 1 लाख रुपये पगार आहे. नवऱ्याकडून पोटगी मिळविण्यासाठी महिलेने कोर्टात खोटी माहिती दिली. त्यामुळे महिलेच्या नवऱ्याला दर महिन्याला पंधरा हजार देण्याचे आदेश दिले होते. कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरोधात महिलेच्या पतीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. खरी माहिती समोर आल्यानंतर न्यायालयाने पोटगी पंधरा हजारावरुन कमी करत दहा हजार केली आहे.

बचाव पक्षाचे वकिल एपी लोगनाथन यांनी न्यायालयात सांगितले की, महिलेने आपली नोकरी आणि खोटी पगाराची स्लीप दाखवून न्यायालयाची दिशाभूल केली. त्यांनी न्यायालयात सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे दाखवली. महिलेने डिसेंबर 2022 मध्ये आपल्या पगाराच्या स्लीपमध्ये 87 हजार 876 रुपये दाखवण्यात आली होती. लोगनाथन यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी फक्त वडिलांची नाही तर आई-वडिल दोघांची असते. त्यामुळे स्वत:च्या फायद्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू शकत नाही.

हे प्रकरण 2022 चे असून त्या जोडप्याला एक मुलगा आहे. ज्याच्या पालन पोषणासाठी पत्नीने 15 हजार रुपये महिना भत्ता मागितला होता. ही पोटगी मिळविण्यासाठी तिने आपला खरा पगार लपवला आणि न्यायालयासमोर खोटी कागदपत्र दाखवण्यात आले. आता प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालयाने पोटगीची रक्कम पाच हजार रुपये कमी करुन दहा हजार रुपये केली आहे. त्यामुळे पत्नीला दरमहा दहा हजार रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा… कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…
बॅक्टेरिया नष्ट होतो - प्राचीन काळात लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट...
झोपेशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? शरीरात काय होतात बदल
Chandrapur news – चंद्रपुरात बिबट्याने भररस्त्यात केली गायीची शिकार
Jalna News – तीन मुलांच्या आईचे 24 वर्षीय तरुणावर प्रेम जडले, कुटुंबाच्या विरोधामुळे जोडप्याने जीवन संपवले
हिंदी महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवण्यात यश
दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासळली; इंडिया गेटवर प्रदूषणाविरोधात निदर्शने, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात
तर तुमच्या कारखान्यावर असलेलं कर्ज सुद्धा आम्हीच फेडलं असतं; शेतकऱ्यांबाबत विखे पाटल्यांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी सुनावलं