हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात

हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात

हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रियन पायलट फिलिप याने तीन दिवसांपूर्वी दोन मित्रांसह धौलाधर पर्वतरांगेत फिरण्याच्या उद्देशाने बिलिंग व्हॅलीतून उड्डाण केले होते. त्याने तीन दिवसांत धौलाधर पर्वतरांगातील विविध ठिकाणी लँडिंग करत दोन रात्री घालवल्या. मात्र तिसऱ्या दिवशी पायलटचा तोल गेला आणि शनिवारी दुपारी 3.30 वाजता मनालीच्या रैनसुई येथे क्रॅश-लँडिंग झाले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या सहकारी पायलटने बीर बिलिंग पॅराग्लायडिंग असोसिएशनला या घटनेची माहिती दिली.

असोसिएशनने तात्काळ त्यांचे बचाव पथक आणि एसएआर पथक घटनास्थळी रवाना केले. बचाव पथकाने तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि रविवारी सकाळी 8 वाजता मनालीच्या टेकड्यांवरून पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढले. पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला हेलिकॉप्टरने चंदीगडमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

ऑस्ट्रियाचा फिलिप हा जगातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग पायलटपैकी एक आहे आणि त्याच्याकडे अनेक जागतिक विक्रम आहेत. बीर बिलिंगमध्ये आठ तासांत 280 किलोमीटरचे सर्वात लांब उड्डाण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. या साहसी खेळाचा थरार अनुभवण्यासाठी फिलिप दरवर्षी जगातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग व्हॅलीमध्ये प्रवास करतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या ४ प्रकारची पाने रात्री चावून खा, सकाळी पोट होईल एकदम साफ, पाहा कोणती ? या ४ प्रकारची पाने रात्री चावून खा, सकाळी पोट होईल एकदम साफ, पाहा कोणती ?
तुमचे पोट जर सकाळी नीट साफ होत नसेल तर दिवसभर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. टॉयलेटला गेल्यानंतरही पोट नीट साफ...
दिलजीत दोसांझला खलिस्तानी समर्थकांकडून धमक्या, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये “खलिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा
हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात
Pune News – बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी महिलांची अनोखी शक्कल, टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घातला
Ratnagiri News – राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत उमरे येथील तरुणाचा मृत्यू
बाजार समितीत चोर्‍यांचे प्रमाण वाढले, भाजीपाल्याच्या गाळ्यावरच मटक्याचा धंदा
कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…