असा कुठला सर्व्हे असतो जो घरात डोकावतो? आदित्य ठाकरे यांच्या सवाल
मातोश्री जवळ काही ड्रोन घिरट्या घालताना दिसले होते. बीकेसीच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. असा कुठला सर्वे असतो जो घरात डोकावतो? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सकाळी आमच्या घरात डोकावणारा एक ड्रोन पकडण्यात आला आणि जेव्हा माध्यमांना याची माहिती मिळाली, तेव्हा MMRDA अधिकाऱ्यांनी सांगितले की हा बीकेसीसाठी करण्यात येणारा सर्व्हे होता आणि त्याला मुंबई पोलिसांची परवानगी होती.
कुठला असा सर्व्हे असतो जो घरात डोकावतो आणि पकडल्यावर लगेच उडून जातो? रहिवाशांना याबद्दल आधी का कळवले गेले नाही? MMRDA फक्त आमच्या घरावरच नजर ठेवत आहे का की संपूर्ण बीकेसीवर? MMRDA ने जमिनीवर उतरून आपल्या निकृष्ट कामावर लक्ष द्यावे, जसे की MTHL (अटल सेतु) जो त्यांच्या भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे. आणि जर पोलिसांनी खरंच परवानगी दिली होती, तर रहिवाशांना याची माहिती का देण्यात आली नाही? असे आदित्य ठाकरे म्हणाले.
A drone was caught peeping into our residence this morning and when the media learnt about it, the @MMRDAOfficial is saying it was a survey being done for BKC with permission of the Mumbai Police.
Okay.
What survey allows you to peep inside homes and fly out quickly when…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 9, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
A drone was caught peeping into our residence this morning and when the media learnt about it, the
What survey allows you to peep inside homes and fly out quickly when…
Comment List