ट्रेंड – ऊन-पाऊस एकाच फ्रेममध्ये
          निसर्गाचा अद्भुत चमत्कार दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाऊस पडतो जेव्हा संपूर्ण वातावरण ढगाळ बनते. वेगवेगळ्या भागात पडणाऱ्या पावसाची क्षमता कमी-जास्त असू शकते. पण एकाच रस्त्यावर अर्ध्या बाजूला पाऊस तर अर्ध्या बाजूला ऊन असे चमत्कारी दृश्य तुम्ही पाहिले आहे का? नसेल तर व्हायरल व्हिडीओत हे अनोखे दृश्य पाहता येते. व्हिडीओत दिसून आलेल्या या घटनेला ‘सूर्यपाऊस’ म्हणून ओळखले जाते. हा व्हिडीओ weekendvibeswithvarma नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही अश्चर्य व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List