पोटच्या मुलीवर अत्याचार; नराधम पित्याला सक्तमजुरी
पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा प्रकार २०२१ मध्ये भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.
आरोपीने ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेसोबत शरीरिक संबंध ठेवले. त्रासाला कंटाळलेल्या पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यानंतर तातडीने भाईंदर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपपत्र ठाणे न्यायाल यात दाखल करण्यात आले. हा खटला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांच्या समोर आल्यावर सरकारी वकील हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि १३ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून नराधम पित्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार दंड अशी शिक्षा सुनावली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास बाबर यांनी तपास अधिकारी म्हणून काम पहिले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List