हरमनप्रीत कौरला मिळाली मोठी ऑफर; एका मोठ्या कंपनीची झाली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

हरमनप्रीत कौरला मिळाली मोठी ऑफर; एका मोठ्या कंपनीची झाली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

टीम इंडियाच्या रणरागिणींसाठी 2025 हे वर्ष खूप महत्त्वाच ठरलं. गेली कित्येक वर्ष जेतेपदाची प्रतीक्षा करत असलेल्या टीम इंडियाने अखेर बाजी मारली. हिंदुस्थानी महिला संघाने आपली 52 वर्षांची जगज्जेतेपदाची प्रतीक्षा संपवली आणि ट्रॉफी आपल्या नावे केली. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळलेल्य़ा या खेळाने इतिहासाच्या पानांवर आपलं नाव कोरलं. हिंदुस्थानच्या या रणरागिणींची संपूर्ण जगभरातून वाह वाह होत असताना आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीने कर्णधार हरमनप्रीत कौरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harmann (@imharmanpreet_kaur)

रिअल इस्टेट कंपनी ओमॅक्स लिमिटेडने यासंदर्भातील एक निवेदन जारी केले आहे. हरमनप्रित कौरची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ओमॅक्ससोबत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करताना आणि तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि समुदायांना बळकटी देण्यासाठी काम करणाऱ्या कंपनीशी जोडल्याबद्दल मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीत कौरने दिली आहे. ओमॅक्स ही देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानीने मारली बाजी

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत महिला क्रिकेटचे नवे जगज्जेते होण्याचा इतिहास रचला. 58 धावांची जबरदस्त खेळी करणाऱ्या दिप्तीने 39 धावांत 5 विकेट घेत हिंदुस्थानच्या ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दीप्ती शर्मा हिने 5 विकेट्स, तर शेफाली वर्मा हिने 2 विकेट्स घेतल्या. शेफाली हिला प्लेअर ऑफ द मॅच आणि दीप्ती हिला प्लेअर ऑफ द सिरीजने गौरविण्यात आले.

INDW vs SAW Final – हिंदुस्थान विश्वविजेता! महिला संघाने कोरले विश्वचषकावर नाव

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जेमिमाने मानधन केले डबल वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जेमिमाने मानधन केले डबल
हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी तब्बल 47 वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या या विजयानंतर महिला खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा...
मुलीचा प्रेम विवाह मान्य नव्हता, पित्याने मुलीच्या सासऱ्याला मारहाण करुन घराला लावली आग
निवडणूक आयोगाला काहीच ऐकायचे नाही आणि कारवाई करायची नाही; अरविंद सावंत यांचा संताप
ट्रेनमध्ये ब्लॅंकेटवरून वाद, रागाच्या भरात अटेंडंटने केलेल्या चाकूहल्ल्यात जवानाचा मृत्यू
COSTA Saving अ‍ॅप वापरताय? मुंबई पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले ‘हे’ आवाहन
ICC WWC 2025 – ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये विश्वविजेत्या हिंदुस्थानच्या 3 खेळाडूंचा समावेश
मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा