Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती

Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती

कार्तिकी वारीची गर्दी ओसरल्याने, पंढरपूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली असून त्यासाठी 1600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारकरी भाविक व शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने दररोज 90 टन कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या दोन दिवसांत शहर चकाचक होईल, असा विश्वास मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दैनिक सामनाशी बोलताना व्यक्त केला.

कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक दाखल झाले होते. यात्रा कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात विविध ठिकाणी दिंड्यासह वारकरी, भाविक वास्तव्य करत होते. दशमी एकादशी व व्दादशी या तीन दिवशी मोठी गर्दी असल्याने कचरा उचलण्याचे काम संथ गतीने करावे लागत असते. शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे वारकरी, भाविकांसह स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाते.

शहरासह नदीपात्र, वाळवंट, भक्ती सागर, पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास 1600 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे 350 कायम इतर 100 कर्मचारी तर जवळपास 1068 हंगामी कर्मचारी व 80 सुपरवायझर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक, जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत 30 पथके स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत.

या पथकामार्फत दररोज 90 टन कचरा गोळा करण्यात येत आहे. 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र सुरू आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 4 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 6 डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज 80 ते 90 टन कचरा उचलण्यात येत आहे.

पंढरपुरातील, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, पत्राशेड दर्शन बारी, भक्ती मार्ग, वाखरी, 65 एकर, संतपेठ, स्टेशन रोड, जुनिपेठ, गोविंदपुरा, मनिषा नगर, पालखी तळ तसेच नदीपात्रातील वाळवंट येथील स्वच्छता करण्यात आली. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व प्रांत अधिकारी तथा नगरपालिका प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यधिकारी महेश रोकडे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे यांनी शहर स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन केलेले दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महिला डॉक्टरचे चारित्र्य हनन करणाऱ्यांवर कारवाई करा! फलटण पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे सहा तास ठिय्या आंदोलन महिला डॉक्टरचे चारित्र्य हनन करणाऱ्यांवर कारवाई करा! फलटण पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे सहा तास ठिय्या आंदोलन
सातारा फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी शिवसैनिक व नागरिकांनी आज थेट फलटण पोलीस ठाण्यासमोर सहा तास ठिय्या आंदोलन केले. हे पोलीस...
रोहित आर्या पवई ओलीस नाट्य : मानवाधिकार आयोगाने चौकशीसाठी नेमली समिती
नवी मुंबईत रक्ताची टंचाई; संकलन निम्म्याने घटले, वर्षभरात फक्त साडेतीन हजार पिशव्या जमा
ठाणे-बेलापूर प्रवास आता होणार सुपरफास्ट; नवी मुंबई पालिका उभारणार तीन नवे फ्लायओव्हर
कर्जत पोलीस ठाण्यातील पोलिसांचा अजब कारभार; चोरीची तक्रार करताय? आधी बैलाचा जन्म दाखला दाखवा !
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
एसटीच्या मोकळ्य़ा जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प