कंत्राटदाराचा निष्काळजीपणा विलेपार्ले येथे जिवंत झाड कोसळले
          विलेपार्ले पूर्व शहाजीराजे मार्ग शकुन बिल्डिंगजवळ पालिकेच्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे भरदिवसा तीन मजल्यांइतके भलेमोठे झाड अचानक रहदारीच्या रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड पडल्याच्या प्रसंगी या ठिकाणी कंत्राटदार किंवा पालिकेचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण राहिला असता, असा सवाल उपस्थित होत आहे.
विलेपार्लेच्या शहाजीराजे मार्ग येथे कंत्राटदाराच्या माध्यमातून पालिकेचे रस्ता आणि गटाराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना संबंधित रस्त्यावर वर्दळही नियमितप्रमाणे सुरू ठेवण्यात आली आहे. असे असताना आज अचानक दुपारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळले. विशेष म्हणजे रहदारी सुरू असलेल्या या रस्त्यावर खूप वेळ हे झाड असेच पडून होते. त्यामुळे झाड मधोमध पडून पुन्हा रस्त्यावर कोसळण्याचा धोका होता. ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या अग्निशमन दलाला बोलावून घेतले. यानंतर हे धोकादायक झाड हटवण्यात आले. त्यामुळे या दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. यानंतर रस्त्यावरची वाहतूक सुरळीत झाली. यावेळी शाखाप्रमुख प्रकाश सपकाळ, आनंद पाठक, हितेश खानविलकर उपस्थित होते.
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List