आईच्या इच्छेसाठी एकट्याने संपूर्ण गावाचे कर्ज फेडले

आईच्या इच्छेसाठी एकट्याने संपूर्ण गावाचे कर्ज फेडले

कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करू नये, यासाठी गुजरातमधील एका व्यावसायिकाने आपल्या संपूर्ण गावातील लोकांचे कर्ज फेडले आहे. ही घटना गुजरातमधील अमरेली जिह्यातील जिरा गावात घडली आहे. या गावातील 290 शेतकरी गेल्या 30 वर्षांपासून कर्जाच्या खाईत अडकले होते. याच गावचे रहिवासी बाबूभाई जिरावाल यांनी या सर्व शेतकऱ्यांवर असलेले एकूण 90 लाखांचे कर्ज स्वतःहून फेडले आहे.

जिरा गावात 1995 सालापासून सेवा सहकारी मंडळाबाबत एक मोठा वाद सुरू आहे. या समितीच्या तत्कालीन प्रशासकांनी शेतकऱ्यांच्या नावाने फसवी कर्जे काढली. हे शेतकऱ्यांना माहितीच नाही, परंतु त्यांच्या नावावर कर्ज असल्याने या कर्जात मोठी वाढ झाली. कर्जामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत, कर्ज आणि अन्य लाभांपासून वंचित ठेवण्यात आले. बँकांनी गावातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला. कर्जाचा अभाव त्यांना त्रास देत होता. कर्जामुळे जमिनीचे विभाजन करणेही अशक्य होते म्हणून माझ्या आईला गावातील शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी तिचे दागिने विकायचे होते. आईची इच्छा आम्ही दोन्ही भावांनी मिळून पूर्ण केली, असे बाबूभाई जिरावाला यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी मी आणि माझा भाऊ बँक अधिकाऱ्यांना भेटलो. आमची इच्छा त्यांना बोलून दाखवली. बँकेनेही कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात सहकार्य केले. गावातील शेतकऱ्यांवर एकूण 89 लाख 89 हजार 209 रुपयांचे कर्ज होते. आम्ही ते कर्ज फेडले व बँकेकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळवले आणि ते सर्व शेतकऱ्यांना वाटले. आमच्या आईची इच्छा पूर्ण करत तिला खरी श्रद्धांजली वाहिल्याबद्दल मी व माझे कुटुंब आनंदी आहोत, असे बाबूभाई म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जेमिमाने मानधन केले डबल वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जेमिमाने मानधन केले डबल
हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी तब्बल 47 वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या या विजयानंतर महिला खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा...
मुलीचा प्रेम विवाह मान्य नव्हता, पित्याने मुलीच्या सासऱ्याला मारहाण करुन घराला लावली आग
निवडणूक आयोगाला काहीच ऐकायचे नाही आणि कारवाई करायची नाही; अरविंद सावंत यांचा संताप
ट्रेनमध्ये ब्लॅंकेटवरून वाद, रागाच्या भरात अटेंडंटने केलेल्या चाकूहल्ल्यात जवानाचा मृत्यू
COSTA Saving अ‍ॅप वापरताय? मुंबई पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले ‘हे’ आवाहन
ICC WWC 2025 – ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये विश्वविजेत्या हिंदुस्थानच्या 3 खेळाडूंचा समावेश
मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा