Ola चे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध एफआयआर, कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. बेंगलुरू पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ अंतर्गत एफआयआर दाखल केली असून, यात भाविश अग्रवाल यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. बेंगळुरू पोलिसांनी एफआयआरमध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास यांचेही नाव घेतले आहे. याप्रकरणी कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये भाविश अग्रवाल यांचे नाव नव्हते. परंतु मृताच्या भावाच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीतील ३८ वर्षीय कर्मचारी के. के. अरविंद यांनी २८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. ते २०२२ पासून ओला इलेक्ट्रिकमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. अरविंद यांच्या भावाने दावा केला की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाच्या खात्यात 17 लाख रुपये जमा करण्यात आले होते. अरविंद यांच्या भावाने सांगितले की, त्यांच्या भावाने आत्महत्या करण्यापूर्वी २८ पानांची एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये त्याने भाविश आणि इतर अधिकाऱ्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List