हिंदी माझी मावशी, माय मरो मावशी जगो! प्रकाश सुर्वेंचे वादग्रस्त वक्तव्य
“मराठी माझी आई आहे तर, हिंदी माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे”, असं वादग्रस्त वक्तव्य मिंधे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलं आहे. उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत मिंधे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे म्हणताना दिसत आहेत की, “मराठी माझी मातृभूमी माझी आई आहे. मात्र उत्तर भारत ही माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे. कारण मावशी जास्त प्रेम करते.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List