मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठा संघर्ष, चोरी करून मानसिक छळ केल्याचा चेअरमनच्या बहिणीचा आरोप

मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठा संघर्ष, चोरी करून मानसिक छळ केल्याचा चेअरमनच्या बहिणीचा आरोप

शिक्षणासारखं पवित्र कार्य नाही मात्र याचं शिक्षण संस्थेत गैरवर्तन करणाऱ्यांची देखील काही कमी नाही. याच पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील नामांकित मंदार एज्युकेशन सोसायटीच्या कारभारात मोठा वाद निर्माण झाला आहे. संस्थेचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांविरुद्ध चोरी, आर्थिक गैरव्यवहार, मालमत्तेचे नुकसान आणि सामाजिक बहिष्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. चेअरमन मंदार शिंदे हे तक्रारदार असलेल्या डॉ. सी. वेदांती विलास सावंत यांचे सख्खे भाऊ आहेत.

डॉ. सी. वेदांती विलास सावंत (62) यांनी पेढांबे पोलीस ठाण्यात 1 नोव्हेंबर रोजी याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत मंदार राजाराम शिंदे (चेअरमन, रा. कोळकेवाडी), जितेंद्र नाना कांबळे (अलोरे कॉलनी), विजय रावजी राणे (पेढांबे भराडेवाडी), अनंत गणपत सुतार (कोळकेवाडी पठार), मारुती राणे (कोळकेवाडी पठार), सागर चंद्रकांत शिरगावकर (कुंभार्ली) आणि संतोष कदम (मुंढे) या सात जणांना आरोपी करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, जानेवारी 2024 पर्यंत डॉ. सावंत आणि त्यांचे पती हे संस्थेच्या व्हाईस चेअरमन शैलेजा राजाराम शिंदे (फिर्यादींची आई) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा संपूर्ण कारभार पाहत होते. मात्र, जानेवारी 2024 मध्ये चेअरमन मंदार शिंदे यांनी संस्थेत येऊन प्रत्यक्ष कारभार पाहण्यास सुरुवात केली. चेअरमन मंदार शिंदे आणि व्हाईस चेअरमन शैलेजा शिंदे यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून बँक ऑफ इंडिया, पेढांबे शाखेतील संस्थेच्या मुख्य बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप डॉ. सावंत यांनी केला आहे.

20 लाखांहून अधिकचा अपहार

आरोपी मंदार शिंदे यांनी संस्थेतील ठेकेदार सतीश बाळकृष्ण शिंदे यांच्या बँक खात्यात अनेक रकमा जमा करून संस्थेच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत आहे. तसेच, चेअरमन मंदार शिंदे यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र कांबळे, विजय राणे, अनंत सुतार, मारुती राणे, सागर शिरगावकर आणि संतोष कदम यांच्या मदतीने संस्थेच्या मालकीची बस बेकायदेशीररित्या भंगारात विकली. याशिवाय, संस्थेतील जीर्ण झालेले साहित्यही भंगारात विकून अंदाजे 20 लाखाहून अधिकची रक्कम संस्थेत जमा न करता स्वतःकडे ठेवून घेतली. यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, 26 जून 2025 रोजी डॉ. सावंत मुंबईत असताना, चेअरमन मंदार शिंदे यांच्या आदेशानुसार इतर सहा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संस्थेतील निवासस्थानाचे कुलूप तोडून फिर्यादीच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश केला. त्यांनी निवासस्थानात चोरी करून मोठे नुकसान केले. यापूर्वी 24 मार्च 2024 रोजी संस्थेच्या विश्वस्तांच्या बैठकीत डॉ. सावंत यांनी चेअरमन मंदार शिंदे यांना निवासस्थानाची वीज आणि पाणीपुरवठा का बंद केला, अशी विचारणा केली असता, मंदार शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

सामाजिक बहिष्काराचेही कलम

डॉ. सावंत यांना संस्थेत तोंडी प्रवेश बंदी करणे, डायल 112 वर कॉल करून पोलिसांना बोलावणे, निवासस्थानाची वीज तोडणे, पाणी बंद करणे, तसेच विद्युत सापळा रचून फिर्यादीचा अपघात घडवण्याचा प्रयत्न करणे आणि संस्थेच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अन्नपाणी देण्यास मज्जाव करणे अशा कृती करून त्यांना सामाजिक बहिष्कृत करण्यात आल्याचेही तक्रारीत स्पष्ट केले आहे. या गंभीर तक्रारीवरून पेढांबे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रेंड – ऊन-पाऊस एकाच फ्रेममध्ये ट्रेंड – ऊन-पाऊस एकाच फ्रेममध्ये
निसर्गाचा अद्भुत चमत्कार दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाऊस पडतो जेव्हा संपूर्ण वातावरण ढगाळ बनते. वेगवेगळ्या भागात पडणाऱ्या...
नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी
Andhra Pradesh Accident – हैदराबादला जाणारी बस उलटली, एकाचा मृत्यू; अनेक जखमी
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी