सदोष मतदार यादीवरती निवडणूक होता कामा नये, ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टीस; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सदोष मतदार यादीवरती निवडणूक होता कामा नये, ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टीस; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टीस आहे. आणि ते कोणाची नोकरी करताहेत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच हे सरकार जेन झींना का घाबरतंय? एक जुलैनंतर ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ते महाराष्ट्राचे तरुण मतदान का करू शकणार नाही? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली आहे.

मतचोरीचा एक मुद्दा आहे. परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रात एकवटले. आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे. त्या भाषणात मी म्हटलं होतं की, आम्ही शाखा-शाखांमधून मतदार ओळख केंद्र ही सुरू करतोय. त्याची सुरुवात आता होईल. कारण दहा तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर पुढच्या आठड्यात आक्षेप आणि काही सूचना असतील तर त्या स्वीकारल्या जातील. तर आताच ती वेळ आहे. कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

माझ्याकडे मतदार यादीतल्या व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती. म्हणजेच काय जे सक्षम नावाचं अॅप आहे ते अॅप आणि निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडून हाताळला जात नाहीये, अशी शंका आहे. आम्ही अजून आरोप करत नाहीत ही शंका आहे. आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली. सर्वसामान्यांच्या बाबतीत असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी मागयाची, कोणाकडे मागायची? आणि नाव वगळं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आयोगाचे लोक माझ्याकडे आले कसे? याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे अॅप्लीकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्या नंबरवर जर का ओटीपी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं. आणि कदाचित माझ्या कुटुंबातील माझ्यासकट चार नावं ही वगळण्यात आली असती. याच्या मागे नेमकं कोण आहे? कोणाचा डाव आहे? याची एक खातरजमा करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष सत्तावधारी वगळता एकवटलेले आहेत. आम्ही आमच्या शाखांमधून मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत. मी नागरिकांना विनंती करतोय की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही? आपलं नाव यादीत आहे की नाही? हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा. आणि जर का काही गोंधळ आहे तर तो वेळेत आपल्याला सुधारता येईल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही

मतदारांना आणखी एक विनंती आहे की, निवडणूक आयोगाची भूताटकी आहे. एकेका घरामध्ये ४०-४० ते ५०-५० नावं ही नोंदवली गेली आहेत. तर मतदारांना विनंती करतोय की, आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का? ही निवडणूक आयोगाची भूतं उभी केलेली आहेत ती आपल्या घरात राहात तर नाहीत ना? याची सुद्धा खात्री करायला पाहिजे. म्हणून जिथे-जिथे आमची केंद्र उभारली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जातपात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन त्या मतदार यादीची तपासणी करावी. आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं? तिकडून कुठे वगळं गेलं आहे का? वयामध्ये कुठे फरक आहे का? लिंग बदललं आहे का? सगळं आपण येऊन तपासावं. हे मी मतदारांना एक आवाहन करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्याचबरोबरीने आम्ही जी एक मागणी केलेली आहे की, एक जुलै कट ऑफ डेट ठेवलेली आहे. एक जुलैनंतर १८ वर्षांची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांना मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये. तुम्ही जगभर बघताय याच वयातील मुलं रस्त्यावर येताहेत आणि क्रांती करताहेत. ज्यांना आपण जेन झी म्हणतो. तर हे सरकार जेन झींना का घाबरतंय? जर लोकसभा ते विधानसभा या सहा किंवा पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की, जवळपास ४५ लाख मतदार महाष्ट्राच्या यादीत घुसवले गेलेत आहेत. जर त्या चार महिन्यांमध्ये ४५ लाख मतदार हे कोणी घुसवले, कुठे गेले, काय करताहेत? हा प्रश्न आहे. पण घुसवले गेले असतील तर एक जुलैनंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं-मुली मतदान का करू शकणार नाही? म्हणून त्या सगळ्या मुलांना आणि मुलींना विनंती करतोय की, तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा. आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून वंचित ठेवतोय, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मतचोरीचा विषय आम्ही सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो की, निवडणूक आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की, एवढा सगळा गडबड घोटाळा हा बाहेर आल्यानंतर आपण राज्य निवडणूक आयोगाला सुधारित यादी मतदारांची होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी आमची मागणी आहे. निवडणुका घेऊ नका, असे आम्ही म्हणत नाही. पण निवडणुका घेताना सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टीस आहे. आणि ते कोणाची नोकरी करताहेत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी
सोमवारी ईशान्य नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहेत. यालुंग री शिखरावर ही...
Andhra Pradesh Accident – हैदराबादला जाणारी बस उलटली, एकाचा मृत्यू; अनेक जखमी
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती