सोने सवा लाख, तरीही खरेदीला जोर, ग्राहकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठला
धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या वर्षी सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत तरीही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने व चांदीच्या विक्रीत कोणतीही घट झालेली नाही.
या वर्षी धनत्रयोदशीला सोने आणि चांदीची विक्री गेल्या वर्षीइतकीच प्रमाणात राहिली, परंतु किमती वाढल्यामुळे मूल्याच्या बाबतीत विक्री 25 टक्क्यांनी वाढली आहे. यावरून असे दिसून येते की, सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडत आहेत असे असूनही लोकांनी या धनत्रयोदशीला मोठय़ा प्रमाणात खरेदी केली आहे. विशेष म्हणजे नाण्यांची खरेदी झाली आहे. या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचे नाणे प्रति 10 ग्रॅम नाणे सुमारे 1.40 लाख रुपयांना विकले गेले, जे लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय होते.
गेल्या वर्षी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 80 हजार रुपये होती, तर चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 98 हजार रुपये होती. या वर्षी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1 लाख 30 हजार रुपये होती आणि 1 किलो चांदीची किंमत सुमारे 1 लाख 80 हजार रुपये होती. 18 ऑक्टोबर रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1 लाख 34 हजार 800 होती, तर चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 1 लाख 74 हजार होती. गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी देशात सुमारे 39 टन सोने विकले गेले होते.
- इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले की, मुंबईतील झवेरी बाजारात सोने आणि चांदीची नाणी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी दिसून आली. शनिवारी सकाळपासूनच विक्री जोरदार होती आणि या वर्षीही गेल्या वर्षीइतकीच सोन्याची विक्री होईल असा अंदाज आहे. या वर्षी सोन्याच्या किमतीने सर्वोच्च उच्चांक गाठलेला दिसला आहे.
- असा अंदाज वर्तवण्यात येतोय की, या वर्षी देशभरात 1 लाख करोड रुपयांचा व्यापार झाला. त्यामध्ये 60 हजार कोटी रुपयांचा सोने-चांदीचा व्यापार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List