ठाण्यातील वारसा हक्काच्या कर्मचाऱ्यांना खूशखबर; 25 जणांना पालिकेत मिळाली कायम नोकरी

ठाण्यातील वारसा हक्काच्या कर्मचाऱ्यांना खूशखबर; 25 जणांना पालिकेत मिळाली कायम नोकरी

ठाण्यातील वारसा हक्काच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत लागलेल्या २५ वारसा हक्क कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेत कायम नोकरी मिळाली आहे. दरम्यान जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत वारसा हक्काच्या एकूण ३०० जणांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात आले आहे.

लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते. अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाते. आस्थापना विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम घेऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, आस्थापना अधीक्षक रश्मी कांबळी आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना सामावून घेण्यासाठी अत्यंत पारदर्शीक पद्धतीने भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या वारसांपैकी महापालिकेच्या सेवेत वर्ग ३ चे १ व वर्ग ४ चे २४ अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती पत्रे देण्यात आली. यापैकी काही पत्रे प्रातिनिधिक स्वरूपात नुकतीच महापालि का आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते देण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती पत्रे मिळाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;