मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक बदने याला पाच दिवसांची कोठडी
सातारा जिह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा शनिवारी (दि. 25) रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. आज बदने याला आज सायंकाळी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यातील दुसरा आरोपी असलेला घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यालाही पुणे येथून अटक करण्यात आली आहे.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा दोन दिवस फरार होता. त्याला शोधण्यासाठी पंढरपूर व पुणे येथे पोलिसांनी पथके पाठविली होती. मात्र, तो पोलिसांना सापडला नाही. शेवटी शनिवारी (दि. 25) रात्री तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याला ताबडतोब अटक करून फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. आज सातारा जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्यास न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, बदने याला अटक केली तेव्हा त्याने मी निर्दोष असल्याची माहिती दिली.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List