पाच साखर कारखान्यांना ‘शो कॉज’ नोटीस, विनापरवाना ऊस गाळप
यंदाचा ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू व्हायचा आहे परंतु त्यापूर्वीच सातारा जिह्यातील 3 आणि सोलापूर जिह्यातील 2 साखर कारखान्यांनी विना परवाना ऊस गाळप सुरु करून साखर आयुक्तांच्या निर्णयाला ठेंगा दाखवला आहे. साखर आयुक्तालयाने देखील संबंधित पाच साखर कारखान्यांना शो कॉज नोटिसा बजावल्या असून याप्रकरणी उद्या (दि.27) सुनावणी ठेवण्यात आली आहे.
विनापरवाना ऊस गाळप हंगाम सुरू करणाऱ्यांमध्ये सातारा जिह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (रेठरे,ता.कराड), जयवंत शुगर्स प्रा.लि. (धावरवाडी.ता.कराड), ग्रीन पॉवर शुगर्स प्रा.लि. (गोपुज,ता.खटाव) या 3 साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. (वेणुनगर,गुरसाळी,ता.पंढरपूर) आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.-युनिट नं. 2 (करकंब,ता.पंढरपूर) या 2 साखर कारखान्यांचा समावेश आहे. प्रादेशिक सहसंचालकांच्या अहवालानंतर या कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List