मुलाला अभ्यासाचे टेन्शन आल्यास…
बऱयाचदा पालकांच्या तक्रारी असतात की मुले घरी आल्यावर अभ्यास करत नाहीत. कारण, बऱयाच मुलांना अभ्यासाचे टेन्शन येत असतं. परंतु, ते बोलत नाहीत.
जर तुमच्या घरातील मूल अभ्यासाचं टेन्शन घेत असेल तर सर्वात आधी पालकांनी मुलाला शांतपणे त्याच्याशी बोलावे. मुलाचे प्रश्न आणि काय चिंता आहेत, ते ऐकून घ्याव्या.
परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी मुलाला समजून घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यास कर असे सातत्याने बोलणे टाळावे. मुलाच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. तो व्यवस्थित जेवण करतो का हे पाहावे.
मुलगा दिवसभरात योग्य विश्रांती घेतो का तेही पाहा. मुलाला मानसिक ताण होणार नाही, याची काळजी घ्या. त्याला अभ्यास करण्यात मदत करा. अभ्यासाची गोडी लावा.
चिंता आणि कौटुंबिक समस्यांमुळे मुलांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे काही मुले अभ्यास करत नाही. घरात हसते खेळते वातावरण ठेवा. मुलांसमोर भांडण करणे टाळावे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List