प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…
विवाहबाह्य संबंधातून दोघांचा मृत्यू झाला आहे. एका गर्भवती महिलेची तिच्या प्रियकराने चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. तर पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात संतापलेल्या नवऱ्याने जे केले त्याने सर्वांना धक्का बसला आहे.
शालीनी (22) असे त्या महिलेचे नाव असून तिला दोन मुली आहेत. तर तिच्या पतीच नाव आकाश (23) असून तो रिक्षाचालक आहे. तो रुग्णालयात जीवनमरणाच्या दारात आहे. आशु उर्फ शैलेंद्र (34) हा शालिनीचा प्रियकर होता. शालिनी पुन्हा एकदा आई होणार होती. यावेळी आशूने दावा केला की, तिच्या पोटात असलेले बाळ त्याचे आहे. मात्र शालिनीने तिच्या पोटातले बाळ आकाशचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आशू संतापला होता.
शनिवारी आकाश आणि शालिनी कुतूब रोडवर गेले असताना हा हल्ला करण्यात आला. अचानक आशु आला आणि त्याने आकाशवर चाकूने हल्ला केला.मात्र तो बचावला. त्यानंतर त्याने शालिनीला पाहिले आणि तिच्यावर अनेक वार केले. जेव्हा आकाशने आपल्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने आकाशवरही वार केले मात्र आकाशने त्याच्या हातातला चाकू खेचून घेत तोच आशूच्या पोटात खुपसला. पोलिसांनी आशुला रुग्णालयात नेले. तर शालिनीचा भाऊ रोहित तिला आणि तिच्या पतीला त्याच रुग्णालयात घेऊन गेले. यात शालिनी आणि आशूचा मृत्यू झाला. पत्नीला वाचवताना आकाशवर अनेक वार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शालिनीची आई शीला यांच्या जबाबावरून पोलिसांनी खून आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शालिनीच्या बहिणीने सांगितले की, काही वर्षांपूर्वी शालिनी आणि आकाशचे नात्यात दुरावा आला होता. तेव्हाच तिचे आशुशी ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ते काही काळ एकत्र राहिले. शालिनी आणि आकाश यांनी नंतर समेट केला आणि ते त्यांच्या दोन्ही मुलांसह एकत्र राहू लागले. शालिनी आता पुन्हा गर्भवती होती. त्याने शालिनीच्या पोटात असलेल्या बाळाचा बाप तो असल्याचा दावा केला होता. शालिनीने आकाश हाच बाळाचा बाप असल्याचे सांगितले. त्यामुळेच आशुने तिच्यावर आणि तिच्या पतीवर हल्ला करण्याची योजना आखली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List