पुढच्या महिन्यात धक्कादायक खुलासे होतील…ब्रिटन न्यायालयात नीरव मोदीने केला दावा
मागच्या सहा वर्षापासून ब्रिटनच्या तुरुंगात बंद असलेला आणि पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या प्रत्यार्पणा प्रकरणात पुढील महिन्यात खळबळजनक खुलासे केले जातील असे तो म्हणाला आहे. त्यामुळे तो नेमके काय खुलासे करणार आहे याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
नीरव मोदीवर पीएनबी बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित हिंदुस्थानात गंभीर आरोप आहेत. बँक ऑफ इंडियाच्या सुमारे 66 कोटी रुपयांच्या थकबाकीशी संबंधित एका प्रकरणात नीरव मोदी ब्रिटनच्या उच्च न्यायालयात हजर झाला . नीरव मोदी यांनी तुरुंगातील स्थिती आणि आरोग्याचे कारण देत खटल्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. जानेवारी 2026 साठी खटला पुन्हा सुरू केला जाईल. यावेळी नीरज मोदीने दावा केला की, बँक ऑफ इंडिया माझ्या प्रत्यार्पणाबद्दल बोलत आहे, मात्र आता मी इथेच आहे. लवकरच मी काही धक्कादायक खुलासे करणार असल्याचे तो म्हणाला.
पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीत त्याचा खटला फेटाळला जाईल किंवा त्याला जामीन मिळेल असा दावा नीरव मोदीने केला आहे. त्याने नवीन पुरावे सादर करण्याची परवानगी मागितली होती आणि न्यायालयाने ती मंजूर केली आहे. त्यामुळे आता साऱ्यांचेच या प्रकरणाकडे लक्ष लागून राहीले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List