समोशासाठी तरुणाला द्यावे लागले घड्याळ, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई
मध्य प्रदेशच्या जबलपुर रेल्वे स्टेशन एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला ट्रेनमध्ये समोसे घेणे चांगलेच महाग पडले आहे. त्याला समोशाच्या पैसे देण्यावरुन अशी परिस्थिती उद्भवली की त्याला हातातले घड्याळ काढून द्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत आरोपी वेंडर विरोधात कारवाई सुरु केली आहे.
वृत्तानुसार, ही घटना 17 ऑक्टोबर रोजी घडली. एका प्रवाशाने ट्रेनमध्ये समोसा विक्रेत्याकडून समोसे खरेदी केले आणि फोनपे वापरून पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र नेटवर्कच्या अडचणीमुळे त्याला पैसे पोहोचत नव्हते. अखेर ट्रेन सुरु झाली. त्या प्रवाशाने नंतर पैसे पाठवतो असे सांगितले. मात्र त्या विक्रेत्याने त्याची कॉलर पकडली आणि त्याला थांबवून ठेवले. वाद वाढल्यानंतर घाबरलेल्या प्रवाशाने हातातले घड्याळ काढून दिले. कारण ट्रेन सुरु झाली होती. एका अन्य प्रवाशाने या घटनेच्या व्हिडीओ रेकॉर्ड करुन सौोशल मीडीयावर पोस्ट केला. ज्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला .
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जबलपूरच्या डीआरएमने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तपासात ही घटना 17 ऑक्टोबर रोजी जबलपूर रेल्वे स्थानकावर घडली. आरोपी विक्रेत्याची ओळख पटली आहे आणि रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि त्याला ताब्यात घेतले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List