मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका, लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी असंच एक विधान केलं आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण टपाल आहे. त्यांनी लव्ह जिहादबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्या म्हणाल्या आहे की, “तुमची मुलगी तुमचं ऐकत नसेल, इतर धर्मातील इसमाबरोबर जाण्याचा, लग्न करण्याचा विचार करत असेल तर तिचे पाय तोडून टाका. मन थोडं कठोर करा. परंतु, मुलीचे पाय तोडताना मागे हटू नका.” मध्य प्रदेशात एका कार्यक्रमात बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.
प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत की, “जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा पालक तिला लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप मानता., परंतु जेव्हा तीच मुलगी मोठी होते आणि विधर्मी होण्याचा विचार करते तेव्हा तिला थांबवणे आवश्यक आहे. अशा मुलींवर लक्ष ठेवा. “
त्या म्हणाल्या, “जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा आई आनंदाने म्हणते, आमच्या घरी लक्ष्मी आली. पण ती मोठी झाल्यावर कोणाची तरी बायको होण्यासाठी घर सोडून निघून जाते. अशा मुलींना मारहाण करून त्यांची समजूत घालायला हवी.” दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या विधानावर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List