हे करून पहा -रांगोळी काढता येत नसेल तर…
बऱयाच स्त्रियांना रांगोळी काढायची हौस असते. परंतु, रांगोळी काढता येत नाही. जर तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढू शकता. ठिपके एका रेषेत जोडून एक सोपी डिझाइन बनवता येऊ शकते. बाजारात उपलब्ध असलेले रांगोळीचे साचे वापरून आकर्षक रांगोळी तयार करता येऊ शकते.
रंगाऐवजी रंगीत फुले, पाने व दिवे वापरूही आकर्षक रांगोळी तयार केली जाऊ शकते. रांगोळी काढण्यापूर्वी तुम्ही खडू किंवा पेन्सिलने हलकी रचना आधीच करू शकता. त्यानंतर त्यात व्यवस्थित रंग भरू शकता. वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस काढून सोप्या आकारानी रांगोळी काढता येऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List