सावर्डेच्या आफिया चिकटेचे दैदिप्यमान यश, महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी झाली निवड
रत्नागिरी जिल्ह्याच्या सावर्डे येथील गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीची गुणवंत खेळाडू आफिया चिकटे हिची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. पंधरा वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील ही निवड असून, या निमित्ताने आफिया आता महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन (एम.सी.ए.) मार्फत पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नुकतीच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे 15 वर्षांखालील वयोगटातील मुलींची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीला जिल्ह्यातून असंख्य होतकरू खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सावर्डे येथील गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीची विद्यार्थिनी आफिया चिकटे हिने रत्नागिरी जिल्हा संघात आपले स्थान निश्चित केले. मागील तीन वर्षांपासून ती प्रशिक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. ती सह्याद्री शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List