मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, सरकार निवडणुकीमध्ये व्यस्त; वडेट्टीवार यांची टीका

मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, सरकार निवडणुकीमध्ये व्यस्त; वडेट्टीवार यांची टीका

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना अद्याप शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. ”अशा वेळी कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने उभं करण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून महायुती सरकार मात्र निवडणूकीच्या तयारीत व्यस्त आहेत, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा 26 लाख हेक्टर जमिनीवरील शेतीला फटका बसला असून शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. त्याबाबत ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”बळीराजाच्या घरात दिवाळीला असणार अंधार, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतलं पाणी, उद्ध्वस्त झालेली घरं आणि थंड पडलेलं सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. सप्टेंबर या एका महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिकं पाण्यात गेली आहेत. मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये सरकार व्यस्त आहे,बैठका सुरू आहेत. तोंडावर दिवाळी आली आहे, पण शेतकऱ्यांना आता कोण विचारत आहे… दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार अस सांगत होते.. अजूनही मदत मिळालेली नाही कसली दिवाळी? कुठून आणावे गोडधोड पदार्थ, मुलांसाठी कपडे? हे सरकार म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे. किमान हेक्टरी ५०,००० मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे! दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दररोज अंडी खाणाऱ्यांनो सावधान! ‘या’ गंभीर आजाराचा धोका, अभ्यासातून धक्कादायक खुलासा दररोज अंडी खाणाऱ्यांनो सावधान! ‘या’ गंभीर आजाराचा धोका, अभ्यासातून धक्कादायक खुलासा
बरेच लोक असे आहेत जे दररोज अंडी खातात. अंडी खाल्याने शरीराची ताकद वाढते. अंडी स्वस्त आणि पोषक असल्याने ती सहज...
राजस्थानमध्ये धावत्या बसमध्ये अग्नीतांडव, 12 प्रवाशांचा मृत्यू; काही जण गंभीर जखमी
Jalna News – वाढोणा तांडा येथील शाळकरी मुलांचा तलावात बुडून मुत्यू, गावावर शोककळा
दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP-1 निर्बंध लागू, १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर घालण्यात आली बंदी
मित्रासोबत फ्लॅट पहायला गेला अन् 31व्या मजल्यावरून कोसळला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू
मतचोरी व निवडणुकीतील घोटाळ्याचा मुद्दा राहुल गांधींनीच सर्वात प्रथम ऐरणीवर आणला, निवडणूक प्रक्रियेवर सर्वांनाच संशय – हर्षवर्धन सपकाळ
मी तुमचं काम पाहिलं आहे, मला दुसरं काही बोलायचं नाही; ED बद्दल काय म्हणाले सरन्यायाधीश?