पुरलेली डेडबॉडी काढून मेकअप करतात! इंडोनेशियातील शेकडो वर्षांची परंपरा

पुरलेली डेडबॉडी काढून मेकअप करतात! इंडोनेशियातील शेकडो वर्षांची परंपरा

वेगवेगळ्या देशात वेगळ्या परंपरा आहेत. इंडोनेशियाच्या तोराजा मध्ये अशीच एक अनोखी परंपरा आहे.  इंडोनेशियाच्या ताना तोराना परिसरात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी जुनी आणि अनोखी परंपरा आहे. त्या परंपरेला मानेने समारोह बोलले जाते. ही परंपरा तोराजा लोकांद्वारे शेकडो वर्षापासून पाळली जात आहे. दर तीन वर्षाने मृत व्यक्तींचे कुटुंबिय त्यांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढतात.या अनोख्या परंपरेविषयी जाणून घेऊया

इंडोनेशियामध्ये मृत व्यक्तीचे कुटुंब आपल्या पूर्वजांच्या कबरी खोदून त्यांना बाहेर काढतात. त्यांचा छानसा मेकअप करुन त्यांना स्वच्छ कपडे घालतात.त्यांचे केस विंचरतात आणि फोटोही काढतात. या परंपरेचा उद्देश हाच असतो की, आपल्या पूर्वजांप्रती सन्मान आणि प्रेम दाखविणे आहे. तिथल्या लोकांचे मानणे आहे की मृत्यू म्हणजे अंत नाही, ते जीवनाचे आणखी एक रुप आहे.

या समारोहाच्या निमित्ताने कुटुंब आपल्या पूर्वजांना भेटल्याचे समाधान मिळते. हा समारोह दर तीन वर्षांनी असतो. त्यात संपूर्ण समुदाय सहभागी होतो. त्यानंतर पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन ते पुन्हा त्यांना कबरीत ठेवतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;