IND VS WI वेस्टइंडिजला व्हाईटवॉश, दुसरी कसोटी जिंकत टीम इंडियाने 2-0 ने जिंकली मालिका
दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. के एल राहुल याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजने दिलेले 120 धावांचे लक्ष्य पार केले. शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेली ही पहिली कसोटी मालिका तर वेस्ट इंडीजविरुद्ध लागोपाठ जिंकलेली दहावी कसोटी मालिका आहे.
हिंदुस्थानने 5 बाद 518 धावांवर डाव घोषित केल्यानंतर विंडीजला 248 धावांवर रोखून पहिल्या डावात 270 धावांची मोठी आघाडी घेतली होती. विंडीजवर फॉलोऑन लादून अखंड 200 षटके गोलंदाजी करूनही हिंदुस्थानला डावाने विजय मिळविता आला नाही. फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर वेस्ट इंडीजच्या जॉन कॅम्पबेलने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकवले, तर शाय होपने तब्बल आठ वर्षांनंतर शतकाची नोंद केली. शेवटच्या जोडीने तब्बल 79 धावांची भागीदारी करत 2025 मधील त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदारी केली. वेस्ट इंडीजने तिसऱ्या दिवसाच्या 2 बाद 173 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या डावात वेस्टइंडीजने काहीशी झुंज दिली आणि 390 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 120 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य टीम इंडियाने 7 गडी राखून गाठले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List