कतार एअरवेजच्या दोहा-हाँगकाँग विमानात तांत्रिक बिघाड, अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
दोहाहून हाँगकाँगला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात हवेतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला. यामुळे विमानाचे अहमदाबाद येथील विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कतार एअरवेजचे विमान QR816 ने मंगळवार दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात आले आहे. विमानाची तांत्रिक तपासणी सुरू आहे.
एअरलाइनच्या अधिकृत निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली आहे. कतार एअरवेजचे दोहाहून हाँगकाँगला जाणारे QR816 या विमानात उड्डाणानंतर काही वेळात तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे अहमदाबाद येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी सध्या तांत्रिक तपासणी केली जात आहे. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विमानाची सखोल केल्यानंतर उड्डाण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे कंपनीने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List