डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
सध्याचं वातावरण पाहता अनेकांना डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होताना दिसत आहेत. साधं व्हायरल दिसणाऱ्या तापाची लक्षणे नंतर डेंग्यू सारख्या आजाराची निघतात. मग अशावेळी औषधांपासून ते आहारापर्यंत सगळ्याच गोष्टी बदलाव्या लागतात. काहींना याची माहिती असते तर काहींचा गोंधळ होतो. जसं की अनेकांना भात खाण्याबद्दल संभ्रम असतो. म्हणजे डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? असा प्रश्न असतो. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तर घेऊच शकता. जाणून घेऊयात की डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही. तसेच आहार नेमका कसा असावा हे देखील जाणून घेऊयात.
डेंग्यूची लक्षणे काय असतात?
डेंग्यूच्या लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, तीव्र स्नायू आणि सांधेदुखी आणि लाल पुरळ यांचा समावेश आहे. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले नाही तर डेंग्यूपासून पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
रुग्णाचा आहार कसा असावा?
आहारतज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या रुग्णांनी आहार हलकाच ठेवावा. दुपारी थोड्या प्रमाणात भात खाऊ शकतो. माफक प्रमाणात भात खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. तथापि, आहारतज्ज्ञांच्या मते, रात्री भात खाणे टाळावे.
डेंग्यूमध्ये काय खावे?
डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. अशावेळी पपईच्या पानांचा रस पिण्याची शिफारस केली जाते. प्लेटलेट्सचा काउंट वाढवण्यासाठी तुम्ही पपईच्या पानांच्या रसासोबत पपईचे सेवन करू शकता. पण संध्याकाळच्या वेळी पपई खाणे टाळावे. तसेच, अंड्यातील पिवळ बलक काढून टाकून अंड्याचा पांढरा भाग खाणे चांगले मानले जाते.
पौष्टिकतेने समृद्ध दही फायदेशीर ठरेल
डेंग्यूच्या रुग्णांना दही खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी दही प्रभावी ठरू शकते. पण रात्री दही खाणे टाळा. दिवसा मर्यादित प्रमाणात ते खा. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला डेंग्यूपासून लवकर बरे व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहार योजनेत खिचडीचा समावेश करू शकता.
महत्त्वाची टीप: डेंग्यू झाल्यावर योग्य आहार जसा महत्त्वाचा आहे तसेच उपचारही महत्त्वाचे आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच उपचारही सुरु ठेवा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List