हिवाळ्यात तमालपत्र पाण्यात उकळून प्यायल्यास काय फायदे होतात?

हिवाळ्यात तमालपत्र पाण्यात उकळून प्यायल्यास काय फायदे होतात?

सध्याचे वातावरण म्हणजे कधी जोरदार पाऊस असल्याने हवेत गारवा जाणवतो तर कधी मध्येच ऊन पडत आहे. या वातावरणाचा परिणाम हा नक्कीच तब्येतीवर होतो. अशा वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकल असे आजार होत आहेत. तर बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

लोक हिवाळ्यात तसेच अशा बदलणाऱ्या वातावरणात आरोग्यासाठी दररोज आल्याचा चहा, आले किंवा हळदीचे पाणी पितात.परंतु आयुर्वेदात आणखी एक खास उपाय आहे ज्यामुळे नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते तसेच या आजारांपासून संरक्षण होते. हा उपाय म्हणजे स्वयंपाकातील एक मसाला. तमालपत्र सर्वांच्या स्वयंपाकघरात असतो. त्यात औषधी गुणधर्म असतात. तमालपत्राचे पाणी पिल्याने शरीराला असंख्य फायदे मिळतात.

पाण्यात उकळलेले तमालपत्राचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते – तमालपत्राचे पाणी अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असते. ते प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी आणि फ्लू टाळण्यास मदत होते.

पचन सुधारते – तमालपत्राचे पाणी पचनसंस्था मजबूत करते आणि गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते.

शरीराला डिटॉक्सिफाय करते – तमालपत्र शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते आणि त्वचा स्वच्छ राहते.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम – तमालपत्रातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि घसा खवखवण्यापासून आराम देतात.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त – तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

तमालपत्राचे ‘हे’ पाणी कसे तयार करावे?

तमालपत्राचे पाणी बनवण्याची पद्धत फार सोपी आहे.

सर्वप्रथम 2 ते 3 तमालपत्र घ्या आणि ते चांगले धुवा. आता एका पॅनमध्ये 2 ग्लास पाणी घाला आणि त्यात तमालपत्र घाला आणि ते उकळवा. पाणी उकळून अर्धे झाल्यावर ते थंड करून गाळून घ्या. आणि हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी पिऊ शकता.

हे पाणी पिण्याआधी काय खबरदारी घ्यावी?

तमालपत्राचे पाणी फायदेशीर असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. दिवसातून एक कप पुरेसे आहे. गर्भवती महिला आणि ज्यांना काही विशिष्ट ऍलर्जी किंवा आरोग्य समस्या आहेत त्यांनी ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महत्त्वाची टीप: ताप, सर्दी किंवा कोणताही आजार झाला असेल तर घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांचे उपचार घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘डिजिटल अरेस्ट’ करून श्रीरामपुरातील डॉक्टरला सात कोटींचा गंडा ‘डिजिटल अरेस्ट’ करून श्रीरामपुरातील डॉक्टरला सात कोटींचा गंडा
सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांकडून तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये लुबाडल्याचा धक्कादायक...
प्रेक्षकच आमचे खरे मायबाप! वंदना गुप्ते यांनी सांगितला एका अनोख्या सहीचा किस्सा
याद्यांमध्ये गोंधळ तरी तीच यादी कशी वापरता? राज ठाकरे यांचा सवाल
व्हीव्हीपॅट लावा नाहीतर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांची मागणी
बदलत्या वातावरणाला सामोरे जाताना आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत
पांढरे सोने फुलले; कमी भावामुळे शेतकऱ्यांवर संकट
संग्राम जगताप यांना दौरा रद्द करून मुंबईत हजर राहण्याचे आदेश