कारल्याच्या पिकातून 11 लाखांचा 112 किलो गांजा जप्त

कारल्याच्या पिकातून 11 लाखांचा 112 किलो गांजा जप्त

अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात सुपा पोलिसांनी कारवाई करत 11 लाख 20 हजार रुपये किमतीचा तब्बल 112 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. कारल्याच्या पिकात गांजाची झाडे लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती ज्योती गडकरी यांनी पथकासह ही कारवाई केली.

शहाजापूर शिवारातील भाऊसाहेब सोनबा शिंदे यांनी त्यांच्या पिंपळगाव कौडा (ता. नगर, जि. अहिल्यानगर) येथील शेतात अवैध गांजाची लागवड केल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल मरकड यांना मिळाली होती. त्यानंतर गडकरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शेतात छापा टाकला. तपासणीदरम्यान कारल्याच्या पिकामध्ये गांजाची झाडे लपवून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी झाडे जप्त केली असता, त्याचे एकूण वजन 112 किलो असल्याचे निष्पन्न झाले. या हिरव्या रंगाच्या ओलसर झाडांची बाजारभावानुसार किंमत सुमारे 11 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणात भाऊसाहेब सोनबा शिंदे (वय 59, रा. शहाजापूर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, मंगेश नागरगोजे, इथापे, मरकड, सातपुते, गायकवाड, कोल्हे, आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण
माओवादी- नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ...
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन; वाचा काय आहेत मुद्दे…
उद्धव ठाकरेंकडून चोकलिंगम यांना निवेदन; बैठकीत काही मुद्दे अनिर्णित, सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या पुन्हा भेटणार; संजय राऊत यांची माहिती
मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, सरकार निवडणुकीमध्ये व्यस्त; वडेट्टीवार यांची टीका
Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दराचे फटाके; चांदीच्या दरात एका दिवसात 10 हजाराची वाढ
पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.