ChatGPT मेकरची मोठी घोषणा; स्वतःचे AI चिपसेट बनवणार, सर्वात मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप
ChatGPT चे मेकर OpenAI ने एका नवीन पार्टनरशिपची घोषणा केली आहे. अमेरिकन कंपनी येत्या काही दिवसांत स्वतःचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चिपसेट बनवणार आहे. हे चिपसेट कंपनीच्या स्पेशल कंप्यूटर आणि पीसींमध्ये काम करतील. यासाठी ओपनएआयने या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ब्रॉडकॉमसोबत पार्टनरशिप केली आहे.
ओपनएआयने केलेली ही पार्टनरशिपची घोषणा ही त्यांच्या अलिकडेच केलेल्या प्रमुख घोषणांपैकी एक आहे. ब्रॉडकॉमसोबत स्वतःची चिप डिझाइन करण्यासाठी काम करत असल्याचे ओपनएआयने जाहीर केले आहे. त्यामुळे आता भविष्यात, OpenAI स्वतःचे स्पेशल कंप्यूटर प्रोसेसर विकसित करेल. खर तर, 2022 मध्ये चॅटजीपीटी लाँच केल्यापासून कंपनी जनरेटिव्ह एआय क्रांतीमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वाखाली, ओपनएआयने अनेक प्रमुख कंपन्यांसोबत पार्टनलशिप केली आहे. ज्यात अमेरिकन कंपन्या एनव्हीडिया आणि एएमडी, तसेच दक्षिण कोरियन कंपन्या सॅमसंग आणि एसके हिनिक्स यांच्यासोबत डेटा सेंटर्स आणि एआय चिप्सवरील करारांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List