जेवल्यानंतर घरात फेरफटका मारता का? मग तुम्ही स्वतःचे नुकसान करत आहात
आजकाल या धावपळीच्या जगात सर्वांनाच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं जमत नाही. कारण कामासोबतच इतर गोष्टीही सांभाळाव्या लागतात. अनेकदा आपण हे पाहिले असेल की जेवणानंतर लोक शतपावली करायला जातात. किंवा ते टेरेसवर काही मिनीटे चालून येतात. कारण जेवण झाल्यावर चालणे चांगले असते असे म्हटले जाते. पण ज्यांच्याकडे एवढा वेळ नाही किंवा काही कारणास्तव जमलं नाही तर अशावेळी लोक बाल्कनीत किंवा हॉल, बेडरूम ते किचन अशा घरातल्या घरात फेऱ्या मारतात. असे केल्याने आपल्याला काही शारीरिक हालचाल केल्याचे समाधान मिळते, पण ते खरोखर घरातल्या घरात मारलेला फेरफटाका शरीरासाठी फायदेशीर आहे का? तर, एका पॉडकास्ट दरम्यान एका डॉक्टरांनी यावर सांगितलं आहे की, घरातल्या घरात चालण्याची ही सवय फायदेशीर होण्यापेक्षा शरीरासाठी जास्त हानिकारक ठरू शकते.
घरातच फिरणे आरोग्यदायी आहे का?
आजकाल, बहुतेक लोक जेवणानंतर किंवा संध्याकाळी त्यांच्या खोलीत किंवा बाल्कनीत चालणे पसंत करतात. पण डॉक्टरांच्या मते ही सवय तुमच्या गुडघ्यांसाठी खूप हानिकारक असू शकते. खरं तर, जेव्हा तुम्ही घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये चालता तेव्हा जागा सहसा मर्यादित असते. यामुळे तुम्हाला वारंवार चालताना जपून लक्ष देऊन चालावं लागतं. किंवा अडखळणार नाही याची काळजी घेत चालावं लागतं. त्यामुळे त्याचा ताण हा गुडघ्यांवर येत असतो. त्यामुळे हाडे अजून दुखणे काढू शकतात.
शरीर सरळ चालण्यासाठी बनवलेले आहे.
डॉक्टर म्हणतात की आपले शरीर सरळ चालण्यासाठी डिझाइन केलेले असते. पण घरी लहान टेरेसवर चालताना, तुम्ही वारंवार एक पाऊल मागे घेता, ज्यामुळे तुमच्या गुडघ्यांवर जास्त दबाव येतो. यामुळे गुडघेदुखी होते शिवाय भविष्यात गुडघ्याला दुखापत होण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही हे दररोज केले तर धोका आणखी वाढू शकतो. त्यासाठी घरातल्या घरात फेरफटका मारणे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त करतो.
नेहमी घराबाहेरच शतपावली करायला जाणे योग्य
घरात चालणे हा एक सोयीस्कर पर्याय वाटू शकतो, परंतु तो गुडघे आणि सांध्यासाठी खूप धोकादायक ठरतो. घरातल्या घरात चालणे शरीराला कमीत कमी फायदे मिळतात. म्हणून जेवण झालं की घराबाहेर फेरफटका मारायला जाणे ही चांगली गोष्ट आहे. बाहेर फिरायला जाणे, तसेच कमीत कमी 200 मीटर जागेच्या ठिकाणी चालायला जाणे कधीही चांगले आहे .
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List