अहिल्यानगरमध्ये भरधाव कारची मोपेडला धडक, अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

अहिल्यानगरमध्ये भरधाव कारची मोपेडला धडक, अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली. अल्ताफ गनीभाई सय्यद (45) आणि सोहेल अल्ताफ सय्यद (21) अशी मयतांची नावे आहेत. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाथर्डी रोडवर बाराबाभळी गावच्या शिवारात ही घटना घडली.

सय्यद यांचे बाराबाभळी येथे मांस विक्रीचे दुकान होते. दोघे पितापुत्र कामानिमित्त त्यांच्या मोपेडवरवरून बाराबाभळीकडून भिंगारकडे येत होते. नामदे फार्म समोर आले असता भिंगारकडून पाथर्डीच्या दिशेने चाललेल्या कारने त्यांच्या बाईकला समोरून धडक दिली. यामुळे सय्यद पिता-पुत्राच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक संजय सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;