मी मोदींना थांबायला सांगू शत नाही, कारण…; शरद पवार यांचे स्पष्ट मत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले. मोदी यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. आता त्यांनी थांबावे, असे मत व्यक्त होत आहे. त्याबाबत शरद पवार यांनी आपले मत स्पष्ट केले. तसेच देशात निवडणूक आयोगाविरोधात नाराजी वाढत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सध्याचे राजकारणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. राजकारणात सुसंस्कृतणाचे दर्शन होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. आता त्यांनी थांबावे, असे मत व्यक्त होत आहे. त्याबाबत ते म्हणाले की, वयाच्या 75 नंतर मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना थांबायला सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. माझ्या 75 वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते, असेही ते म्हणाले. आता वाढदिवसाला सरकारी आणि खासगी जाहिराती जास्त दिसतात, असेही त्यांनी सांगितले.
अनेक राजकीय पक्षांमध्ये निवडणूक आयोगाबाबत नाराजी आहे. पहिल्यांदा 300 खासदारांनी नवी दिल्लीत आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीचा निषेध करत मोर्चा काढला होता. ईव्हीएमधील घोटाळा, मतचोरी याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सर्व घोटाळे पुराव्यांसह उघड केले आहेत. देशातील जनतेचा निवडणूक आयोग आणि निवडणूक पद्धतीवर विश्वास बसावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने काम करणे गरजेचे आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List