Chhattisgarh Encounter – सुकमामध्ये चकमक, 5 लाखांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार

Chhattisgarh Encounter – सुकमामध्ये चकमक, 5 लाखांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत 5 लाखांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार झाली आहे. बुस्की नुप्पोन (35) असे ठार झालेल्या महिला नक्षलवाद्याचं नाव आहे. घटनास्थळावरून एक रायफल, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने सुकमा जिल्ह्यातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यात नऊ गुन्ह्यात आरोपी असलेली आणि 5 लाखांचे बक्षीस असलेली बुस्की नुप्पोन ठार झाली, असे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.

बुस्की नुप्पोन ही एसीएम (मलंगीर एरिया कमिटी) सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्याविरुद्ध अरणपूर पोलीस ठाण्यात सात, कुंकुंडा येथे एक आणि गदिरास येथे एक गुन्हे दाखल आहेत. घटनास्थळावरून एक .315 बोर रायफल, पाच .315 रायफल काडतुसे, एक वायरलेस सेट, आठ डेटोनेटर, सुमारे 10 मीटर कॉर्डेक्स वायर, चार जिलेटिन रॉड, एक पिथू (लोड कॅरिअर), स्फोटके, एक रेडिओ, एक बंदा (बंडल), नक्षलवादी साहित्य साहित्यय जप्त करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bad Food Combination: पतंजलीने सांगितले असे फूड कॉम्बीनेशन जे आरोग्यास हानिकारक, कोणते हे पदार्थ ? Bad Food Combination: पतंजलीने सांगितले असे फूड कॉम्बीनेशन जे आरोग्यास हानिकारक, कोणते हे पदार्थ ?
हल्ली फिटनेस आणि हेल्थ संदर्भात जागरुकता वाढलेली दिसत आहे. लोक सकस आहार आणि डाएडकडे वळत आहेत. आणि हे गरजेचे आहे...
ओबीसी आरक्षण गेले, आता नातवाला नोकरी लागणार नाही; आजोबांनी जीवन संपवले
हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे विशाखापट्टणममध्ये इमर्जन्सी लँडिंग
Latur News – भरधाव एसटीची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
मिरजोळ्यात नेपाळी महिला चालवत होती वेश्याव्यवसाय, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा
Photo – पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
जनाची नाही तर मनाची लाज बाळगा आणि कबूल करा… मतचोरीवरून अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाला सुनावलं