राहुल गांधींनी आरोप करताच केंद्रीय निवडणूक आयोगाचेही लगोलग स्पष्टीकरण, काय दिलं उत्तर? वाचा सविस्तर…
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर केलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याने स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) दिले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांवर राहुल गांधी यांनी केलेले आरोपही निराधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात पत्रकार परिषद घेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचा विशेषतः उल्लेख केला आणि म्हटले की तेथे हजारो मतांमध्ये घोटाळा झाला, असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी याआधीही महाराष्ट्र, हरयाणा, नवी दिल्ली येथील निवडणुकांमध्ये कशाप्रकारे मतांची चोरी झाली, हे पुराव्यांसह स्पष्ट करत निवडणूक आयोगाची पोलखोल केली होती. आता त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मतदार यादीतून हजारो नावे कशी डिलीट केली आणि काही ठिकाणी बोगस मतदारांची नावे घुसवली, हे पुराव्यांसह दाखवून दिले. राहुल गांधी यांच्या या पत्रकार परिषदेनंतर मतदार यादीतून ऑनलाईन नावे डिलीट करणे अशक्य असून राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार आणि तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List