इस्रायल- तुर्कीत शाब्दिक युद्ध पेटले; प्राचीन शिलालेखावरून नेतान्याहू आणि एर्दोगान यांच्यात जुंपली
एका प्राचीन कलाकृतीवरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सरकारने जेरुसलेमच्या ज्यू इतिहासाचे समर्थन करण्यासाठी 1990 च्या दशकात तुर्कीकडून एक प्राचीन शिलालेख मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळचे इस्तंबूलचे महापौर आणि आताचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी हा प्रयत्न मोडीत काढला होता. यावरून आता इस्रायल आणि तुर्कीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
इस्रायली पंतप्रधानांनी सोमवारी पूर्व जेरुसलेममधील डेव्हिड सिटीमधील प्राचीन शिलालेखाचा उल्लेख केला. हे क्षेत्र पूर्व जेरुसलेममधील सिलवान या पॅलेस्टिनी परिसरातील एक ख्रिश्चन पर्यटन स्थळ आहे. नेतान्याहूने सांगितलेल्या माहितीनुसार, 1998 मध्ये त्यांनी तत्कालीन तुर्की पंतप्रधान मेसुत यिलमाझ यांना इस्रायलला आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी 1880 मध्ये सापडलेला आणि नंतर ऑट्टोमन साम्राज्याने इस्तंबूल पुरातत्व संग्रहालयात ठेवलेला सिलोम शिलालेख परत करण्याची विनंती केली.
अठराव्या शतकात तुर्की आणि इस्रायलमधील सुरक्षा आणि राजनैतिक संबंध खूप मजबूत होते. मात्र त्यानंतर त्यांच्यात अनेक बदल झाले. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात नेतान्याहू यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांना उद्देशून अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.हे आमचे शहर आहे… श्रीमान एर्दोगान. हे तुमचे शहर नाही, ते नेहमीच आमचे शहर राहील. हे शहर पुन्हा कधीही विभागले जाणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. मी ओटोमन साम्राज्यच्या सर्व कलाकृती परत करेन नाहीतर तुर्कींने मला त्याची किंमत सांगावी, असाही टोला यावेळी नेतन्याहूने लगावला.
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी दिले प्रत्युत्तर
इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या वक्तव्यामुळे तुर्कीचे अध्यक्ष संतापले आहेत. बुधवारी अंकारा येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी नेतन्याहू यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
“तुर्कीने शतकानुशतके इस्लामचा झेंडा उंचवला आहे. आपल्याला चारशे वर्षांपासून पवित्र जेरुसलेमची सेवा करण्याचा मान मिळाला आहे. नेतान्याहू यांना हे माहित नाही. आज मी येथून हे मोठ्याने सांगतोय आहे; कदाचित ते ऐकतीलही, शहाणपणा आणि सहिष्णुतेने, आम्ही हे शहर बनवले आहे, असे त्यांनी सांगितले. 27 वर्षांपूर्वी महापैर असताना मी दिलेले उत्तर कदाचित नेतन्याहू कधीच विसरू शकणार नाहीत. ऐतिहासिक अभिलेखागार हे तुर्कीयेचा शोध आहे आणि एक अमूल्य संपत्ती आहे जी कोणत्याही किंमतीत इतर कोणत्याही देशाला दिली जाऊ शकत नाही, असेही एर्दोगन यांनी स्पष्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List