ट्रम्प दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर, अमेरिका-ब्रिटन यांच्यात 3.6 लाख कोटींचा करार होणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प हे दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर पोहोचले आहेत. मागील सहा महिन्यांत ट्रम्प यांचा हा दुसरा दौरा आहे. ब्रिटनमधील स्टॅन्स्टेड विमानतळावर ट्रम्प यांचे रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आले. या वेळी ब्रिटिश परराष्ट्र सचिव यवेट कूपर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प हे आज विंडसर कॅसल येथे किंग चार्ल्स, क्वीन कॅमिला, प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांची भेट घेतील. ट्रम्प यांच्या सन्मानार्थ सेंट जॉर्ज हॉलमध्ये रात्रीचे जेवणही आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हवांग, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन असे व्यावसायिक नेते सामील होतील. या भेटीदरम्यान अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात तंत्रज्ञान, ऊर्जा आणि व्यापार या क्षेत्रांतील 42 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 3.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे करार होतील. ट्रम्प यांचा हा दौरा उद्या, 18 सप्टेंबर रोजी दुपारी संपणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List