अ‍ॅपलने आणले नवे एआय पॉवर्ड फीचर

अ‍ॅपलने आणले नवे एआय पॉवर्ड फीचर

अ‍ॅपलने बुधवारी आपल्या नव्या आयओएस 26 अपडेटला रोलआऊट केले आहे. हे अपडेट आयफोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर युजर्सला एआय आधारित पॉवर सेव्हिंग फीचर दिसेल. या फीचरचे नाव एडाप्टिव पॉवर आहे. या फीचरमुळे आयफोनची बॅटरी वाचण्यास मदत मिळेल. व्हिडीओ रेकार्ंडग, फोटो एडिटिंग किंवा गेमिंगवेळी बॅटरी वाचवण्याचे काम हे फीचर करणार आहे. हे फीचर सर्व आयफोन्सवर उपलब्ध होणार नाही. केवळ आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स, आयफोन एअर, आयफोन सीरिजमधील सर्व फोन आणि आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स या फोनमध्ये हे फीचर काम करेल. याआधी बॅटरी वाचवण्यासाठी युजर्स ब्राइटनेस कमी करणे, अलवेज ऑन डिस्प्ले बंद करणे किंवा लो पॉवर मोडचा वापर करत होते, परंतु एडाप्टिव पॉवर फीचर स्मार्ट आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;