Pune News – सिंहगडावरून आणखी पाच जण बेपत्ता, बचाव पथकाकडून शोध सुरू
गौतम गायकवाड बेपत्ता प्रकरण ताजे असतानाच सिंहगडावरून आणखी पाच जण बेपत्ता झाल्याचे समोर आलं आहे. या मुलांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस आणि बचाव पथकं मुलांचा शोध घेत आहेत. हे पाचही जण सिंहगडावर फिरण्यासाठी आले होते. सिंहगडावर आणखी पाच जण अडकल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पाच दिवसांपूर्वी गौतम गायकवाड हा तरुण मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेला होता. त्यावेळी तो अचानक गडावरून बेपत्ता झाला. पोलीस आणि बचाव पथकं चार दिवस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर पाचव्या दिवशी गडावरच तो आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. गौतमचा शोध लागल्यानंतर आणखी पाच जण गडावरून बेपत्ता झाल्याचे समोर आलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List