मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 40 ते 50 कोटी रुपयांची जाहिरात देणारा दानशूर कोण? संजय राऊत यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 40 ते 50 कोटी रुपयांची जाहिरात देणारा दानशूर कोण? संजय राऊत यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी 40 ते 50 कोटी रुपायांची जाहिरात केली. अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच 40 ते 50 कोटी रुपयांची जाहिरात देणारा दानशूर कोण असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करणं हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहतायत त्यांना अभिवादन करतायत अशी जाहिरात बाजी काल केली. जाहिरात कोणी दिली? त्या संस्थेच त्या व्यक्तीचं नाव नाही. पण साधारण आम्ही काल या जाहिरातींचा महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जाहिरात, टीव्ही वाहिन्यांवर जाहिरात, राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात. हा सगळा खर्च साधारण 40 ते 50 कोटी रुपये आहे. आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा 40 ते 50 कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले. देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी हे पैसे खर्च केले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, देशाचं दैवतच. भारतीय जनता पक्षाच्या ओरिजनल नव्हे तर डुप्लिकेट तर बाटग्यांनी ही जाहिरात दिलेली आहे. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा. नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेच आहे. त्यावरून संघांच महाराजांवरचं प्रेम खरं आहे ते कळेल. त्या जाहिरातीतून काय सूचित करायच आहे? याचे वेगळेवेगळे अर्थ काढले जात आहेत. हा अदृश्य दानशूर दाता कोण आहे भारतीय जनता पक्षाचा. हा कार्यकर्ता कोण आहे. अदृश्य, अज्ञात व्यक्तीने पन्नास कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली हे महाराष्ट्राला कळायला हवं. जाहिरात करण्याविषयी काही कोणाचा आक्षेप असण्याच कारण नाही. पण वेळ, खर्च, उद्देश आणि हेतू हा स्पष्ट नाही. जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाची नाही. ही कोणीतरी एक अज्ञाशक्ती आहे. या अज्ञात शक्तीने आपल्या नाव का दिलं नाही? नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला आहे. जसं मी काल म्हणालो हा ब्लॅक मनी आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला सूचना दिल्या, भाजप मुख्यालयातून कोणाला सूचना दिल्या. आणि त्यानुसार या 50 सा कोटीचा खर्च जाहिरातीवरती झाला. आता देवा भाऊंनी जाहिराती दिल्या म्हणून त्यांचे जे मंत्रिमंडळातले काही प्रतिस्पर्धी आहेत ते जाहिराती देतील, असं एक जाहिरातीची स्पर्धा या राज्यात भविष्यात पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे राजकीय वापर करणं हे काय आम्हाला मान्य नाही. मराठा आरक्षणाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, आमची आस्था आहे आमची श्रद्धा आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक जातीय राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना जे असे उत्तुंग टोलेजंग शिखरावर आहेत त्यांना तुम्ही खाली आणताय. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची आम्हाला अजूनही प्रतीक्षा आहे. ज्याचं पूजन, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रात केलं होतं. मग त्या स्मारकाविषयी आपण शब्द काढायला तयार नाही. छत्रपतींची विचारसरणी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन जायची, त्याला तुम्ही तिलांजली दिलेली आहे. आणि आपला राजकीय उदो उदो व्हावा म्हणून छत्रपतीच्या चरणी फुलं वाहणारे छायाचित्र आपण प्रसिद्ध करत आहात याची नोंद जनता घेत असते असेही संजय राऊत म्हणाले.

हे राज्य मराठी राज्य आहे. हे राज्य मराठी माणसाचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमातींना हे स्वराज्य मिळवून दिलं आणि त्या स्वराज्यासाठी सगळ्या जाती धर्मपंथातली मावळे महाराजांबरोबर लढत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे, त्या दृष्टीने जगातल्या अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्या विषयी अभ्यास झालेला आहे. त्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अशा प्रकारे करून राजकारण करत असतील तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहताना राज्याचे मुख्यमंत्री दिसतात त्याचा आनंद आहे. त्याच्याविषयी आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण तो अज्ञात जाहिरातदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला. मी तुम्हाला त्याचं एका दिवसाच मूल्य सांगितलं. 40 ते 50 कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झाले. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा प्रतिमा उंचावण्यासाठी हे पैसे खर्च झाले. हा पैसा ठेकेदारांचा आहे, हा पैसा आपण उपकृत केलेल्या लाभार्थी बिल्डरांचा आहे किंवा हा पैसा अंडरवर्ड डॉन मंडळींचा आहे त्ंयाना तुम्ही काहीतरी मदत केली. ज्यांना तुम्ही पीएमएलए कायद्यातून सोडवलेलं आहे, ईडीतून बाहेर काढलंय, अशा लोकांचा हा पैसा आहे. त्याशिवाय कशा करता एवढी कोण दानशुरता दाखवेल? असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Power Yoga : बाबा रामदेव यांनी सांगितला 5 मिनिटांचा पॉवर योगा, यातून मिळतात भरपूर फायदे Power Yoga : बाबा रामदेव यांनी सांगितला 5 मिनिटांचा पॉवर योगा, यातून मिळतात भरपूर फायदे
बाबा रामदेव योगासाठी प्रसिद्ध आहेत. योग गुरु बाबा रामदेव हे अनेक वर्षांपासून योगाचे प्रशिक्षण देत आहेत. रामदेव यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर...
Hockey Asia Cup 2025 – हिंदुस्थानच्या पोरांनी आशिया चषक जिंकला रे…; 8 वर्षांचा दुष्काळ संपवला, विश्व चषकाच तिकीटही केलं पक्क
तुरुंगात प्रज्वल रेवण्णाची ड्युटी लायब्ररीत
वाटद एमआयडीसी विरोधात पोस्ट टाकणाऱ्यांवर तत्पर ‘ॲक्शन’ घेणारे जयगड पोलीस तिहेरी हत्याकांडाबाबत अनभिज्ञ
हर्णे येथील समुद्राच्या पाण्यात मृत पावलेला डॉल्फीन मासा आढळला
Lalbaug Cha Raja … अखेर 33 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
मोदीजी हिंमत दाखवा, अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर 75 टक्के कर लावा; केजरीवालांचं पंतप्रधानांना आव्हान