सोन्या-चांदीत तुफानी तेजी; दिवाळीपर्यंत सोने सव्वा लाखांवर तर चांदी दीड लाखांवर जाणार?
अमेरिकेचे टॅरिफ आणि वाढत्या जागितक अशांततेमुळे जगभरात ताणाव वाढत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोने-चांदी खेरदीकडे वळल्याने सोन्याचांदीच्या दरात तुफानी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत उसळी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यातही ही किंमतीतील उसळी दिसून आली. वायदे बाजारात (MCX) सोन्याची किंमत जवळपास 4 हजार रुपयांनी वाढली आहे. तर चांदीत 2,824 रुपये प्रति किलोने वाढ दिसली. त्याचा परिणाम सराफा बाजारावरही झाला असून सोन्याचांदीचे दर गगनाला भिडले आहेत.
गेल्या आठवड्यात सुरुवातीला सोन्याने चार दिवसात 2100 रुपयांची मुसंडी मारली होती. 4 सप्टेंबर रोजी किंमतीत थोडीपार घसरण दिसून आली. तर 5 सप्टेंबर रोजी 760 रुपयांनी किंमती वधारल्या. त्यानंतर सोने 850 रुपयांनी महागले. दिवाळीत सोन्याचा भाव 1 लाख 25 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता पण व्यक्त होत आहे. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,08,620 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 99,600 रुपये इतका आहे.
आठवड्याच्या सुरुवातीच्या चार दिवसात चांदी 2100 रुपयांनी वधारली. 4 सप्टेंबर रोजी चांदीच्या दर स्थिर होते. तर 5 सप्टेंबर रोजी चांदी एक हजारांनी घसरली. आता एका किलो चांदीचा भाव 1,28,000 रुपयांवर पोहचला आहे. तर सध्या 24 कॅरेट सोने 1,06,340 रुपये, 23 कॅरेट 1,05,910, 22 कॅरेट सोने 97,410 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 79,750 रुपये, 14 कॅरेट सोने 62,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,23,170 रुपये इतका झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List