दुकानाच्या पाट्या बंगालीतच, कोलकाता महानगर पालिकेचे आदेश; उल्लंघन केल्यास कारवाई
कोलकाता शहरातील दुकानावरील पाट्या बंगालीत असल्या पाहिजे असा आदेश कोलकाता महानगरपालिकाने काढला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई केली जाईल अशा इशाराही पालिकेने दिला आहे.
महानगरपालिका आयुक्त धवल जैन यांनी 30 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की सर्व व्यावसायिक आस्थापनांनी 30 सप्टेंबरपर्यंत या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. शहरात बंगाली भाषेची सांस्कृतिक आणि भाषिक ओळख मजबूत करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. पालिकेच्या परिपत्रकानुसार, सर्व व्यावसायिक आस्थापनांनी आपल्या पाट्या, होर्डिंग्जजवर बंगाली भाषेतदाखविणे बंधनकारक असेल. या आदेशाचे पालन करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीनंतर नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाईल असा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
बंगाली भाषेत पाट्या नसल्यास केवळ स्थानिक भाषेला सन्मान मिळणार नाही तर ज्यांना बंगाली वाचता व समजता येते त्यांच्यासाठीही ते सोयीचे ठरेल असे पालिकेने म्हटले आहे. हा निर्णय केवळ भाषिक वर्चस्व वाढविणारा नाही तर सर्वसमावेशकतेलाही चालना देणारा आहे. कोलकाता सारख्या बहुभाषिक शहरात, जिथे विविध समुदाय राहतात, बंगाली भाषेला प्राधान्य देणे म्हणजे स्थानिक संस्कृती आणि ओळख जपण्याचा एक प्रयत्न आहे असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List