Lalbaug cha Raja : रात्री साडे दहानंतर होणार लालबागच्या राजाचं विसर्जन
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन अद्याप झालेले नाही. हे विसर्जन रात्री साडे दहाच्या नंतर समुद्राला भरती आल्यानंतर केले जाणार असल्याचे समजते. राजाला नवीन तराफ्यावर चढवण्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांना यश आले असले तरी सध्या समुद्रात ओहोटी असल्याने विसर्जन करता येत नाहीए.
तब्बल 20 तासांच्या विसर्जन मिरवणूकीनंतर सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांसह पोहोचला होता. मात्र राजाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन तराफ्यावर राजाला चढविण्यास अडचणी येत होत्या. मंडळाचे कार्यकर्ते, तटरक्षक दलाचे जवान, पोलीस व कोळी बांधवांनी प्रयत्न केले मात्र भरतीमुळे राजाला तराफावर चढवण्यास अडचणी येत होत्या.
रात्री अकरा वाजता पुन्हा भरती
सकाळी नऊच्या दरम्यान भरती असल्याने त्यावेळी लालबागच्या राजाचे खोल समुद्रात विसर्जन करण्यात येणार होतं. मात्र आता विसर्जनासाठी पुन्हा भरतीची वाट पाहावी लागणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List