Home Remidies – अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवणे कितपत योग्य?
हिंदुस्थानमधील घरांमध्ये स्वयंपाकघरात अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. ही भांडी हलकी, स्वस्त आणि लवकर गरम होणारी असतात, त्यामुळे अनेक लोक रोजचं जेवण बनवताना या भांड्यांचा वापर करतात. अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर जेवण बनवण्यासाठी किंवा जेवणासाठी वापरण्यात काही हरकत नाही. पण योग्य प्रकारचे अॅल्युमिनियम भांडे वापरणे गरजेचे आहे. चुकीच्या प्रकारे अॅल्युमिनियमचे भांडे वापरल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.
अॅल्युमिनियमची भांडी योग्य प्रकारे वापरल्यास आरोग्यास हानिकारक नाहीत मात्र काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवण बनवताना अॅल्युमिनियमची थोडीशी मात्रा जेवणात मिसळू शकते, विशेष म्हणजे आंबट पदार्थ जसे की टोमॅटो, लिंबू किंवा चिंच वापरल्यास शरीरात दररोज 2 ते 5 मिलीग्राम अॅल्युमिनियम शरीरात प्रवेश करतो. या मात्रेचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही कारण किडनी हे अॅल्युमिनियम बाहेर काढते. पण जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ सेवन केल्यास मेंदू, हाडे आणि किडनी यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
जास्त प्रमाणात अॅल्युमिनियम शरीरात पोहोचले, तर हे न्यूरोलॉजिकल समस्या, किडनीचे नुकसान आणि हृदय तसेच इतर शरीराच्या इतर भागावर वाईट परिणाम करू शकतो. अनेकदा भांड्यांमधून निघणारे हानिकारक पदार्थ गंभीर आरोग्याच्या समस्यांचे कारण बनू शकतात.
अॅल्युमिनियम भांड्यांचा वापर कसा करावा?
-
अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवणे पूर्णपणे धोकादायक नाही, पण याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
-
आंबट आणि मसालेदार अन्न अॅल्युमिनियमच्या भांड्यात वारंवार बनवणे टाळावे.
-
दीर्घकाळ अन्न जतन करण्यासाठी अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर करू नये.
-
स्टेनलेस स्टील, कास्ट आयरन किंवा काचेची भांडे तुलनेने सुरक्षित मानली जातात.
-
अॅल्युमिनियमच्या भांड्याची कोटिंग उघडायला लागल्यास त्यांचा वापर लगेच बंद करावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List