गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर परिक्षेत्र सज्ज, 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त; 29 हजारांहून अधिक मूर्तींचे होणार विसर्जन

गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर परिक्षेत्र सज्ज, 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त; 29 हजारांहून अधिक मूर्तींचे होणार विसर्जन

सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण हे कोल्हापूर परीक्षेत्र सज्ज झाले असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड असा पंधरा हजारांहून अधिकजणांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच एसआरपीच्या पाच कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षेत्रात तब्बल 29 हजारांहून अधिक ‘श्रीं’च्या मूर्तींचे विसर्जन होत असून, विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर अधीक्षक धीरजकुमार बच्चू, गृह उपअधीक्षक तानाजी सावंत, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर आदी उपस्थित होते.

सुनील फुलारी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक लहान 4779, मोठे 3722, एक गाव एक गणपती 315, अशी एकूण 8816 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात लहान 2132, मोठे 3729 आणि एक गाव एक गणपती 74, अशा एकूण 5935 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात लहान 1606, मोठे 5560, एक गाव एक गणपती 537 अशा एकूण 6703 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये लहान 1589, मोठे 1178, एक गाव एक गणपती 251, अशा एकूण 3018 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, पुणे ग्रामीणमध्ये लहान 3011, मोठे- 2063, एक गाव एक गणपती 315, अशा एकूण 5389 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

परीक्षेत्रात एकूण लहान 13,117, मोठे 14,646 आणि एक गाव एक गणपती – 1492, अशा एकूण 29,255 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, संपूर्ण परीक्षेत्रात एकूण 6 लाख 79 हजार 42 घरगुती गणपतींची संख्या आहे.

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीसाठी 3000 पोलिसांचा बंदोबस्त – योगेशकुमार गुप्ता

n कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 8500 सार्वजनिक मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापणा केली आहे. शनिवारी अनंतचतुर्थीदिवशी निघणारी मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी सर्व उपाययोजना केल्या आहेत. 1700 पोलीस अधिकारी, कर्मचारी, 1300 होमगार्ड, असा तीन हजार जणांचा बंदोबस्त नेमला आहे. देखावे पाहताना हुल्लडबाजी, दादागिरी, दंगा घालून सार्वजनिक शांतता भंग करणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल. महिला, तरुणींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, यासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी यावेळी दिली. दरम्यान, आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱया 251 मंडळांवर कारवाई केली आहे. विसर्जन मिरवणुकीतही आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱया मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून, प्रेशर मिड, लेसर लाईट, सीओटू गॅस वापरावर बंदी घातली आहे. प्रेशर मिडचा वापर केल्याबद्दल भुदरगड पोलिसांनी डीजे सिस्टिम जप्त केल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भाजपचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत...
…अन्यथा पैसे बंद होणार! ऐन सणासुदीत लाडक्या बहि‍णींच्या डोक्याला ताप, महायुती सरकारनं दिलं नवं टास्क
पिवळ्या दातांवर ‘हा’ आहे जालीम उपाय, वाचा
केसांमधील उवा होतील चुटकीसरशी गायब, वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला
मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल; पोलिसांकडून झाडाझडती, तपास यंत्रणा अलर्ट
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध